
- Availability: In Stock
- Product Code: MB9788184153538
- Weight: 1.00kg
- Dimensions (L x W x H): 0.75in x 5.50in x 8.50in
- ISBN: 9788184153538
गहन साक्षात्कार
प्रत्येक मानवी जीवनात दैवी स्वरूप स्वत:ला व्यक्त करीत असतं; पण मानवाने त्याच्याकडे काणाडोळा केला, तर असा साक्षात्कार म्हणजे खडकाळ जमिनीत पेरलेलं बीज ठरेल, जे कधीच रुजत नाही. या दैवी जाणिवेतून कोणालाही वगळले जात नाही. किंबहुना मानवच स्वत:ला त्यातून वगळून टाकतो. नेहमीच हिरव्या फांदीवर झुलणाऱ्या प्रत्येक पक्ष्याने, आपल्या मातेचा प्रेमळ हात धरून ठेवणाऱ्या मुलाने जीवनाचे गूढ कोडे केव्हाच सोडवलेले असते आणि त्याचं उत्तरही त्याच्या मुद्रेवर झळकत असतं. तिथे मानव मात्र जीवनाच्या अर्थाविषयी आणि रहस्यांविषयी केवळ औपचारिक आणि अहंमन्य चौकशी करीत असतो. मग जीवनाची गूढ रहस्यं त्याला उमजत नाहीत. ‘मी कोण आहे’, हा प्रश्न तुम्हाला या रहस्यांच्या तळापर्यंत घेऊन जाईल. त्यानंतर एका गहन साक्षात्काराच्या, जाणीवेच्या रुपात ते उत्तर आपोआप तुमच्यासमोर प्रकट होईल...
अदृश्य पण अत्यंत समृद्ध, साधा परंतु संपूर्ण विश्वाला प्रकाश देणारा असा आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं.
Books | |
Author | Paul Brunton |
Binding | Paperback |
ISBN 13 | 9788184153538 |
Language | Marathi |
No of Pages | 368 |
Publication Year | 2015 |
Publisher | WOW Publishing |