- Availability: In Stock
- Product Code: MB9788184154634
- Weight: 0.23kg
- Dimensions (L x W x H): 0.60in x 5.50in x 8.50in
- ISBN: 9788184154634
दिव्य शक्ती घेऊनच तो जन्माला आला...
टी लोबसंग राम्पा तिबेटी धर्मगुरू बनणार हे पूर्वनियोजितच होतं...ग्रहांकडून मिळणार्या सूचना दुर्लक्ष्य करता न येण्याइतपत सुस्पष्ट होत्या. आपलं श्रीमंत घरदार सोडून तो जेव्हा मठात प्रवेश घेण्यासाठी निघाला, तेव्हा पुढ्यात वाढून ठेवलेल्या दमछाक करणार्या धार्मिक शिक्षणाची आणि अत्यंत कठीण अशा शारीरिक कसरतींची त्याला पुसटशी कल्पना होती. त्याचं हृदय अस्वस्थतेनं आणि अनामिक भितीनं भरून गेलं होतं.
ही त्याचीच गोष्ट आहे. चाकपोरी लामासेरी या तिबेटी औषधशास्त्र आणि शरीरविज्ञानाच्या मंदिरात घडून आलेला स्वसंवेद्य होण्याचा, स्वबोधाकडे नेणारा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी तर आहेच पण तो इतका सुंदरही आहे की आपल्या मनावर त्याचे गारूड झाल्या शिवाय राहत नाही.
अवकाश प्रवास, लोलकात किंवा काचगोळ्यात पाहून भविष्य पहाणे, मनुष्याच्या उर्जावलयाचा अर्थ लावणे, ध्यानधारणा आणि अशा अनेक गुढविद्यांमधून हा प्रवास पुढे सरकत रहातो. सर्वसाक्षी आणि सर्वशक्तिमानाचे द्वार खुले करून स्वबोध आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग मोकळे करणारे मार्गदर्शक पुस्तक आहे हे...
Books | |
Author | Dr. T. Lobsang Rampa |
Binding | Paperback |
ISBN 13 | 9788184154634 |
Language | Marathi |
No of Pages | 264 |
Publication Year | 2015 |
Title | तृतीय नेत्र |