Menu
Your Cart

Ati Parinamkarak Yuvakanchya Saat Savayee (Marathi)

Ati Parinamkarak Yuvakanchya Saat Savayee (Marathi)
New -10 % Out Of Stock
Ati Parinamkarak Yuvakanchya Saat Savayee (Marathi)
Day
Hour
Min
Sec
Rs359.00
Rs399.00
Ex Tax: Rs359.00
  • Availability: Out Of Stock
  • Product Code: MB9789390607570
  • Weight: 0.34kg
  • Dimensions (L x W x H): 2.00in x 5.50in x 8.50in
  • ISBN: 9789390607570

किशोरवयीन मुलांना यशासाठी उत्कृष्ट मार्गदर्शक

‘जर अति परिणामकारक युवकांच्या 7 सवयी तुम्हाला उपयोगी वाटत नसतील, तर तुम्ही नक्कीच आदर्श आणि निर्दोष आयुष्य जगत आहात.’
- जॉर्डन मॅक्लॉफ्लिन, वय 17

कल्पना करा की तुमच्याकडे आयुष्यासाठी एक मार्गदर्शक नकाशा आहे - तुम्ही आत्ता जिथे आहात तेथून तुम्हाला भविष्यात जिथे जायचे आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक पावलावर मार्गदर्शक ठरणारी पुस्तिका. तुमची ध्येये, तुमची स्वप्ने, तुमच्या योजना... हे सर्व आता तुमच्या आवाक्यात आहेत. तिथे जाण्यासाठी आता तुम्हाला गरज आहे तर फक्त काही साधनांची!

अति परिणामकारक युवकांच्या 7 सवयी या शॉन कवी यांच्या ऐतिहासिक पुस्तकातून लाखो युवकांना हीच साधने प्राप्त झाली आहेत. आत्मविश्वास, स्वाभिमान आणि यशप्राप्तीसाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक आहे. या नवीन डिजिटल युगामध्ये हे पुस्तक युवकांसमोर येणार्‍या कठीण समस्या आणि त्यांच्या जीवनाला दिशा देणार्‍या निर्णयांवर 7 सवयींची कालातीत तत्त्वे उत्तमरीत्या लागू करते. मनोरंजक शैलीमध्ये, कवी युवकांना स्व-प्रतिमा (ीशश्रष-ळारसश) सुधारण्यात, मैत्री तयार करण्यात, त्यांची ध्येये प्राप्त करण्यात, त्यांच्या पालकांसोबत जुळवून घेण्यात आणि समवयस्कांच्या दबावाचा प्रतिकार करण्यासाठी एक सोपा दृष्टिकोन प्रदान करतात. तसेच सायबरबुल्लीइंग आणि सोशल मीडियासारख्या आजच्या काळातील नवीन आव्हानांना सामोरे जाण्यातही मदत करतात. याव्यतिरिक्त, हे पुस्तक कार्टून, उत्तम कल्पना, उत्कृष्ट उद्धृते आणि जगभरातील खर्‍या किशोरवयीन मुलांबद्दलच्या अविश्वसनीय कथांनी भरलेले आहे.

किशोरवयीन मुलांसाठी, तसेच पालक, शिक्षक, समुपदेशक किंवा किशोरवयीन मुलांसोबत काम करणार्‍या कोणत्याही प्रौढांसाठी हे एक अपरिहार्य पुस्तक आहे. किशोरवयात आणि त्यापुढील आयुष्यात देखील उन्नती आणि भरभराटीसाठी अति परिणामकारक युवकांच्या 7 सवयी हा शेवटचा शब्द बनला आहे.

माझ्या अति परिणामकारक लोकांच्या 7 सवयी या पुस्तकापेक्षा पूर्णतः वेगळे असे, माझ्या मुलाचे शॉनचे हे पुस्तक किोरवयीन मुलांशी थेट बोलते (आणि, शॉन, मी सांगितलेला एकही शब्द तू कधी ऐकला, असे मला वाटत नाही.) हे कितीही पूर्वग्रहदूषित वाटले तरी, हे एक उल्लेखनीय पुस्तक आहे आणि सर्वांनी जरूर वाचावे!’

- Stephen R.Covey (1932-2012), न्यूयॉर्क टाइम्सचे नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक
The 7 Habits of Highly Effective People चे लेखक आणि फ्रँकलिन कवी संस्थेचे सह-संस्थापक.

‘जसा बाप, तसा बेटा’ हे खूप वेळा वापरलेले सामान्य विधान असू शकते, पण शॉनच्या बाबतीत ते अगदी खरे ठरले आहे...शॉनचे अति परिणामकारक युवकांच्या 7 सवयी हे पुस्तक प्रत्येक किशोरवयीन मुलाने वाचले पाहिजे आणि त्याचे अनुकरण केले पाहिजे’
- अरुण गांधी, अध्यक्ष, गांधी वर्ल्डवाईड एज्युकेशन इन्स्टिट्यूट

Books
AuthorSean Covey
BindingPaperback
ISBN 139789390607570
LanguageMarathi
No of Pages358
Publication Year2021
PublisherWOW Publishings
Titleअति परिणामकारक युवकांच्या 7 सवयी

Write a review

Note: HTML is not translated!
Bad Good
Captcha