Menu
Your Cart

Man's Search for Meaning -Tarunasathi Vishesh Sanskaran (Marathi)

Man's Search for Meaning -Tarunasathi Vishesh Sanskaran (Marathi)
New -10 %
Man's Search for Meaning -Tarunasathi Vishesh Sanskaran (Marathi)
Day
Hour
Min
Sec
Rs158.00
Rs175.00
Ex Tax: Rs158.00
  • Availability: In Stock
  • Product Code: MB9789390607648
  • Weight: 0.15kg
  • Dimensions (L x W x H): 0.32in x 5.50in x 8.50in
  • ISBN: 9789390607648
मॅन्स सर्च फॉर मिनिंग

‘द बॉय इन द स्ट्रिप्ड पायजामा’ चे लेखक जॉन बॉयने यांना भावलेलं पुस्तक

‘मॅन्स सर्च फॉर मिनिंग’ हे असं पुस्तक आहे जे वाचायला हवं, जे हृदयात जतन करायला हवं, ज्यावर चर्चा व्हायला हवी आणि मृत्युच्या छावणतील कैद्यांच्या आठवणी जिवंत ठेवण्याचं महत्वपूर्ण काम हे पुस्तक करणार आहे.
- जॉन बॉयन, प्रस्तावनेमधुन

व्हिक्टर ई. फ्रँकल यांचं मॅन्स सर्च फॉर मिनिंग हे होलोकॉस्ट या विषयावरील उत्कृष्ट लिखाण आहे ज्याने वाचकांच्या अनेक पिढ्यांना खिळवुन ठेवलं आहे. अ‍ॅन फ्रॅक चे ‘डायरी ऑफ ए यंग गर्ल’ व एली विसेलचे ‘नाइट’ या पुस्तकांप्रमाणे फ्रँकलचा हा मास्टरपीस म्हणजे नाझींच्या मृत्युछावणीतील जीवनाचं चिरंतर अवलोकन आहे. त्याचबरोबर दुःखाशी सामना करण्याचा व आपल्या जीवनातील उद्दिष्ट शोधण्याचा फ्रँकलने दिलेला संदेश वाचकांना दिलासा देतो आणि त्यांचं मार्गदर्शन करतो. तरुण वाचकांसाठी असलेल्या या आवृत्तीमध्ये फ्रँकलच्या छावणीतील संपूर्ण आठवणी व मानसशास्त्राविषयी असलेल्या त्याच्या लिखाणाचा संक्षिप्त भाग यांचा मुख्यतः समावेश आहे, याशिवाय काही छायाचित्र, मृत्युच्या छावणीचा नकाशा, पुस्तकातील संज्ञांसाठी शब्दकोष, फ्रँकलची काही निवडक पत्र व भाषणं आणि त्याच्या आयुष्यातील प्रसंग व हॉलोकॉस्टमधिल महत्वाच्या घटना यांचा कालक्रमानुसार तक्ता ह्या पूरक गोष्टींचादेखील समावेश केला आहे. या अतिरिक्त माहितीमुळे फ्रँकलची गोष्ट जिवंत होते आणि ही माहिती ज्ञान देण्याचं व घेण्याचं एक मौल्यवान साधन म्हणूनदेखिल उपयुक्त आहे. प्रख्यात लेखक जॉन बॉयने यांची प्रस्तावना फ्रँकलच्या नितीमूल्यांच्या चिरंतन सामर्थ्याची भरभरुन साक्ष देते.

जिवंत राहण्यासाठी केलेला संघर्ष याविषयी असलेल्या साहित्यातील एक चिरस्थायी लिखाण.
-न्यूयॉर्क टाइम्स

अमेरिकेतील पहिल्या दहा सर्वाधिक प्रभावशाली पुस्तकांपैकी एक।

1905 साली व्हिएन्ना येथे जन्मलेल्या व्हिक्टर ई. फ्रँकल याने मानसशास्त्र या विषयावर तीसपेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित केली आहेत. याशिवाय त्याने हार्वर्ड, स्टेनफोर्ड व अमेरिकेतील इतर अनेक विद्यापीठांमध्ये पाहुणा म्हणून काम केलं आहे. 1997 मध्ये फ्रँकलचा मृत्यु झाला.

जॉन बॉयने याने तरुण वाचकांसाठी पाच कादंबर्‍या लिहील्या आहेत. त्यामधिल द बॉय इन द स्ट्रिप्ड पायजामा याचा न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकात समावेश केला आहे व त्यावर आधारित एक चित्रपट तयार करण्यात आला आहे. त्याच्या कादंबर्‍यांचा पन्नासहून अधिक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.

Books
AuthorViktor E. Frankl
BindingPaperback
ISBN 139789390607648
LanguageMarathi
No of Pages148
Publication Year2022
PublisherWOW Publishings

Write a review

Note: HTML is not translated!
Bad Good
Captcha